Header Ads Widget

Mahatma Gandhi Essay | Mahatma Gandhi Nibandh - महात्मा गांधी

Mahatma Gandhi Essay | Mahatma Gandhi Nibandh - महात्मा गांधी

Mahatma Gandhi Essay

Mahatma Gandhi Essay Introduction 

1. महात्मा गांधी Mahatma Gandhi यांचा जन्म:
    महात्मा गांधी Mahatma Gandhi यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी पोरबंदर, गुजरात, भारत येथे झाला. त्यांचा जन्म एका तपस्वी कुटुंबात झाला आणि त्यांनी आपले जीवन साधेपणाने आणि सत्याने जगण्याचा संकल्प केला.

2. महात्मा गांधी Mahatma Gandhi यांचे जन्मस्थान:
    महात्मा गांधी यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर शहरात झाला, जे त्यांच्या आदर्श आणि सत्याग्रहाच्या प्रचारासाठी प्रसिद्ध झाले आहे.

3. महात्मा गांधी Mahatma Gandhi यांचे पूर्ण नाव:
    महात्मा गांधींचे पूर्ण नाव 'मोहनदास करमचंद गांधी' होते, जे त्यांचे वैयक्तिक आणि सामाजिक जीवन दर्शवते.

४. महात्मा गांधी Mahatma Gandh यांचे वडील:
    त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी होते, ते तत्त्वज्ञ आणि आध्यात्मिक विचारवंत होते आणि त्यांच्या जीवनावर त्यांचा मोठा प्रभाव होता.

५. महात्मा गांधी Mahatma Gandh यांची आई:
    महात्मा गांधींच्या आईचे नाव पुतलीबाई गांधी होते, ही त्यांच्या नैतिक मूल्यांची आणि संघर्षमय जीवनाची एक उत्सवी कथा आहे.

६. महात्मा गांधी Mahatma Gandh यांचे शिक्षण:
    गांधींनी त्यांचे प्रारंभिक शिक्षण पोरबंदरमध्ये घेतले आणि नंतर ते परदेशात शिक्षण घेण्यासाठी गेले, जिथे त्यांनी त्यांच्या आदर्शांची साक्षरता आणि नैतिकता सुधारली.

७. महात्मा गांधी Mahatma Gandh यांचा विवाह:
    महात्मा गांधींचा विवाह कस्तुरबा माखनजी यांच्याशी झाला होता, त्याही त्यांच्या सोबती आणि सहचर बनल्या आणि त्यांना सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्यास पाठिंबा दिला.

8. महात्मा गांधी Mahatma Gandh यांनी केलेला अद्वितीय सत्याग्रह:
    महात्मा गांधींनी 1930 मध्ये सॉल्ट मार्चद्वारे एक अनोखा सत्याग्रह केला, ज्याने भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक नवीन दिशा दिली.

९. महात्मा गांधी Mahatma Gandh यांची स्वातंत्र्य चळवळ:
    गांधीजींनी असहकार आंदोलन, दांडी मार्च, भारत छोडो आंदोलन यांसारख्या चळवळींद्वारे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनन्यसाधारण योगदान दिले.

10. महात्मा गांधी Mahatma Gandh यांचे विशेष योगदान:
     महात्मा गांधींनी त्यांच्या अद्वितीय योगदानाद्वारे अहिंसा, सत्याग्रह आणि स्वदेशी चळवळीबद्दल अनोखे बोलले आणि त्यांचे शब्द आजही लोकांना प्रेरणा देतात.

11. महात्मा गांधी Mahatma Gandh यांचा मृत्यू:
     30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांचे निधन झाले, ज्यांना केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात एक अद्वितीय नेता म्हणून स्मरण केले जाते.

Mahatma Gandhi Essay | Mahatma Gandhi Nibandh - महात्मा गांधी

सैतानाशी अहिंसा व असहकाराच्या मार्गाने लढले तर भारताला स्वातंत्र्य मिळू शकेल. या विचारातून ज्यांनी अजीवन अखंड चळवळ उभारली असे महान राष्ट्रीयनेते म्हणजेच महात्मा गांधी ( Mahatma Gandhi ) होय.

1920 ते  1948 हा कालखंड 'गांधी युग' म्हणून ओळखला जातो.

या कालखंडात असामान्य अस कर्तृत्व करून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचा खारीचा वाटा होता.

गांधींचा सत्यावर विश्वास होता,' सत्य म्हणजे ईश्वर आणि ईश्वर म्हणजेच सत्य' त्याचप्रमाणे 'ईश्वर हेच प्रेम व प्रेम हेच ईश्वर' असे ते म्हणत. याच विचारातून सत्याग्रह संकल्पनेचा जन्म झाला. सत्याग्रह म्हणजे अन्याय आणि पिळवणूकीसाठी आत्मिक शक्तीच्या जोरावर केलेला प्रतिकार होय असे महात्मा गांधीजींचे ( Mahatma Gandhi ) मत होते.

   बॅरिस्टर होण्यासाठी महात्मा गांधी ( Mahatma Gandhi ) लंडनला गेले होते. त्यांचे विदेशगमन हे पाप मानून त्यांच्या जातीय बांधवांनी त्यांना बहिष्कृत केले होते. तेव्हा त्यांच्या थोरल्या भावाने त्यांना नाशिकला नेऊन प्रायश्चित्त विधी करवून घेतला. या गोष्टींमुळे गांधींजींच्या ( Mahatma Gandhi ) मनात परिवर्तनाची सुरूवात झाली. गांधीजींवर टॉलस्टाॅयच्या 'द किंग्डम ऑफ गाॅड विदिन यू' आणि गोस्पेल्स इन ब्रीफ या पुस्तकांचा विलक्षण प्रभाव होता.

जानेवारी 1915 ला गांधीजींचे भारतात आगमन झाल्यावर त्यांनी सुरूवातीला पहिली सविनय कायदेभंगाची चळवळ म्हणजेच 'चंपारण्याचा सत्याग्रह' केला.  त्यानंतर पहिला भूक हरताळ अहमदाबादच्या गिरणी कामगारांसाठी केला. तसेच पहिले असहकार आंदोलन 'खेडा' या ठिकाणी केले.

पुढे त्यांनी असहकार आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला वेठीस आणले. परंतु  चौरीचौरा प्रकरणानंतर गांधीजींनी ( Mahatma Gandhi ) असहकार चळवळ मागे घेतली.

संविनय कायदेभंग, वैयक्तिक सत्याग्रह, छोडो भारत चळवळ या चळवळीमध्ये जनतेचे नेतृत्व पत्कारत एका मोठ्या लढ्यासाठी त्यांनी जनतेला जागृत करून संघटित होण्यासाठी प्रयत्न केला.

मिठावरील करातून ब्रिटिश शासनाला त्याकाळी दरवर्षी पाच कोटी पेक्षा जास्त महसूल मिळत होता. पण गरिबांच्या दैनंदिन जगण्यातील मीठ हा आवश्यक घटक असल्याने करोडो गरीब भारतीयांना हा कर अन्यायकारक वाटत होता. त्यातूनच महात्मा गांधीजींनी ( Mahatma Gandhi ) मिठाचा सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला 12 मार्च ते 5 एप्रिल 1930 याकाळात साबरमती ते दांडी अशी दांडी यात्रा  78  सहकाऱ्यांसह करण्यात आली. हे अंतर 240 मैलांचे होते.

स्वदेशी उद्योग व्यवसायांना चालना देणे, दारूबंदी, मिठाचा सत्याग्रह, खेडाजन आंदोलन, सतत चांगल्या मार्गाचा ध्यास, बुनियादी शिक्षण योजना अशा प्रकारे समाजातील सर्व स्तरांचा समावेश होईल त्यांना चालना मिळेल, त्यांचा विकास होईल यासाठी गांधीजींनी ( Mahatma Gandhi ) आयुष्यभर प्रयत्न केले.

त्यांना फक्त राजकीय स्वातंत्र्य अपेक्षित नव्हते तर जनतेची सामाजिक, आर्थिक, आत्मिक प्रगती ही अपेक्षित होती. त्यातून त्यांनी ग्रामोद्योग संघ, बेसिक एज्युकेशन सोसायटी, गोरक्षण संस्था यासारख्या वेगवेगळ्या संस्था आणि संघटना स्थापन केल्या.

समाजातील शोषण संपवण्यासाठी आर्थिक विकेंद्रीकरणाचा मार्ग त्यांनी समाजाला सांगितला.त्यांनी 'विश्वस्त संकल्पना' मांडली आपण आपल्या संपत्तीचे मालक नसून विश्वस्त आहोत, त्यामुळे गरजेपुरती ठेवून उरलेली संपत्ती समाजाच्या कामी लावावी असे त्यांचे प्रामाणिक मत होते.

भारताला बलवान बनविण्याचा कार्यक्रम समजून सांगताना गांधी हाताची पाच बोटे दाखवत. त्यांच्या मते प्रत्येक बोट म्हणजे सुतकताई, अस्पृश्यता निवारण, नशाबंदी, हिंदू मुस्लिम स्नेहभाव, स्त्रियांकरता समानता असा या पाच बोटांमधून ते समाजाला उपदेश करत.

गांधींना संगीताची देखील आवड होती. साबरमतीच्या राष्ट्रीय शाळेत त्यांनी नारायणराव खरे यांना संगीत शिकवण्यासाठी मुद्दाम ठेवून घेतले होते. यातून त्यांच्या संगीताविषयी आवड समजून येते.

स्वातंत्र्य लढ्यातील गांधींची ( Mahatma Gandhi )भूमिका अशी होती की आपला संघर्ष ब्रिटिश लोकांशी नसून साम्राज्यवादी ब्रिटिश सरकारशी आहे. त्यांचे कितीतरी मित्र व सहकारी ब्रिटिश असून ते गांधींना ( Mahatma Gandhi ) मदत करत. गोलमेज परिषदेच्या वेळेस त्याचे स्वागतच झाले होते. गांधीच्या या भूमिकेचे अधिक स्पष्टीकरण करणारी एक क्रिकेट ची घटना महत्वाची आहे. ती अशी,1933-34 मध्ये एम. सी. सी. चा भारत दौरा होता. या दौऱ्याच्या वेळी क्रिकेटपटू विजय मर्चंट यांची लहान बहीण लक्ष्मी हिने एमसीसीच्या संघातील सर्व म्हणजे 16 खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी एक ऑटोग्राफ बुक आपल्या भावाकडे दिले होते. विजय मर्चंट यांनी एमसीसी टर्निंग टीम 1933 हेडिंग खाली 16 ही खेळाडूंच्या साह्या घेतल्या होत्या. नंतर लक्ष्मीने गांधींच्या सहीचा हट्ट धरला. दोन महिन्यांनी गांधी व मर्चंट यांची भेट झाली त्यावेळी विजयने स्वाक्षरीसाठी गांधींना ( Mahatma Gandhi ) विनंती केली. गांधींनी त्या वहीतील एम.सी.सीच्या सोळा खेळाडूंनी केलेल्या सहीचे पान पाहिले व त्या पानावर 16 व्या खेळाडूंच्या सही खाली 17 अंक नोंदवून त्यांनी स्वतःची स्वाक्षरी केली.

या घटनेतून आपल्याला दिसून येते की भारताच्या स्वातंत्र्यासाठी ते निकाराची लढाई करायला तयार असले तरी, ते इंग्लंडच्या सामान्य नागरिकाविरुद्ध नव्हते. आणि इंग्रजांच्या संघाचा थेट सतरावा खेळाडू होण्याची त्यांची तयारी सुद्धा होती.

भारताच्या फाळणीनंतर झालेल्या दंगली थांबवण्यासाठी गांधींनी ( Mahatma Gandhi ) नौखाली येथे शेवटचे आमरण उपोषण केले.

गांधीजी स्वतःच्या भूमिकेला सत्याचा मार्ग म्हणतात, स्वातंत्र्यासाठी मी 300 वर्षे वाट पहायला तयार आहे, पण अनुचित मार्गाचा अवलंब कधीही करणार नाही. अशा या राजकारणातील संत व संतांमधील राजकारणाचा ( Mahatma Gandhi )अंत 30 जानेवारी 1948 रोजी झाला.

Read More - अजून वाचा 

Post a Comment

0 Comments