Header Ads Widget

Draupadi Murmu Biography | द्रौपदी मुर्मू यांचे जीवन चरित्र

Draupadi Murmu Biography | द्रौपदी मुर्मू यांचे जीवन चरित्र

    या लेखामध्ये आपण सध्या आपल्या देशाच्या राष्ट्रपती पदावर कार्यरत असणाऱ्या Draupadi Murmu Biography | द्रौपदी मुर्मू यांचे जीवन चरित्र यावर विचार करणार आहोत. 

Name of Draupadi Murmu / नाव :- द्रौपदी श्याम मुर्मू 

    जन्म झाल्या नंतर घरच्यांनी द्रौपदी यांचे नाव पुती ठेवले होते परंतु प्राथमिक शाळेत प्रवेश घेताना प्राथमिक शिक्षिकेने त्यांचे नाव द्रौपदी ठेवले 

Parent's Name of Draupadi Murmu /पालकांचे नाव :- 

    वडिल :- बिरांची नारायण तुडू,
    आई :- सिंगो तुडू 

Address/पत्ता :- 

    राज्य ओरिसा, जिल्हा मयूरभंज 

Birth Place & Birth Date of Draupadi Murmu /जन्मठिकाण आणि तारीख :- 

    बडीपोसी गाव, 20 जून 1958 रोजी संथाळी जमाती मध्ये आदिवासी बहुल भागामध्ये जन्म

Current Residence Place of Draupadi Murmu/सध्याचे वास्तव ठिकाण :- 
    राष्ट्रपती भवन नवी दिल्ली 

Educational Career of Draupadi Murmu/ शैक्षणिक कारकिर्द:-
    गावामध्येच आठवी पर्यतचे प्राथमिक शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी गावापासून दूर 300 किमी अंतरावर कॅपिटल हायस्कूल मध्ये पुढील शिक्षण पुर्ण केले.  1979 मध्ये भुवनेश्वर येथिल रमादेवी विद्यापीठामधून कला शाखेतील पदवी पुर्ण करून पदवी प्राप्त झाल्या. 

Professional and Political Background of Draupadi Murmu/व्यावसायिक व राजकीय पार्श्वभूमी:-

  रमादेवी विद्यापीठामधून पदवी पुर्ण केल्यानंतर त्यांनी विद्युत विभागामध्ये कनिष्ठ सहाय्यक पदावर 1979 ते 1983 असे सलग चार वर्ष त्यांनी हि नोकरी करून त्यानंतर  रायरंगपुर येथील अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन सेंटरमध्ये शिक्षिका म्हणून काम करण्यास सुरूवात केली आणि १९९७ पर्यंत त्यांनी शिक्षिकेची भूमिका बजावून जनसामान्य लोकांना ज्ञानाची कवाडे खुली केली.

    द्रौपदी मुर्मू यांनी 1997 मध्ये वॉर्ड काऊन्सलर म्हणून राजकीय कारकीर्दीस सुरूवात करून राजकीय जीवनास ख-या अर्थाने सुरूवात केली. त्यानंतर रायरंगपुर च्या नगरपरिषदेमध्ये निवडणूकीस उभ्या राहून त्या निवडणून आल्या आणि नगरपरिषदेच्या उपाध्यक्षा झाल्या. 2000 ते 2009 या काळात त्या आमदार होत्या. 2015 ते 2021 या काळात त्यांनी झारखंड चे राज्यपाल म्हणुन पद भार स्विकारला. 

    महत्वाची गोष्ट अशी की तत्कालीन राज्यात भाजपाचे सरकार अस्तित्वात होते आणि त्या सरकारने सीएनटी - एसपीटी कायदा दुरुस्ती विधेयक पारीत करून त्यांच्या कडे कायद्यात रूपांतर करण्यासाठी पाठवले असता त्यांनी ते फेटाळून लावले होते. 2022 मध्ये त्यांनी यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पराभूत करून देशाच्या दुस-या महिला आणि पहिल्या आदिवासी राष्ट्रपती झाल्या आहेत. वर्ष 2022 ते  आजतागायत त्या राष्ट्रपती पदावर कार्यरत आहे. 

Important Awards/महत्वाचे पुरस्कार:-

    2007 साली ओरिसा विधानसभेच्या माध्यमातून दिला जाणार नीलकंठ पुरस्कार जाहिर. तसेच  सुरीनाम देशाचा  सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांना जून 2023 मिळला. सुरीनाम प्रजासत्ताकचे अध्यक्ष चंद्रिका प्रसाद संतोखी यांनी  त्यांना 'द ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ यलो स्टार' पुरस्कार प्रदान केला होता. हा पुरस्कार मिळवणाऱ्या राष्ट्रपती मुर्मू पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत.

Important events and ups and downs in life of Draupadi Murmu/जीवनातील महत्वाच्या घडामोडी व चढउतार:-
    पोटच्या दोन्ही मुलांच्या  आणि पतीच्या मृत्युनंतर त्यांना नैराश्यातून जावे लागले. ऊन सावलीच्या या खेळात अनेक खाचखळगे त्यांना त्याच्या जीवन प्रवासात अनुभावावे लागले. पण अशा संघर्षमय प्रवासात देखील खचून न जाता त्यांनी मोठ्या हिम्मतीने यावर मात केली.संघर्षमय जीवनाला आध्यात्मिक वाटेवर नेऊन त्यातून त्या सावरल्या आणि स्थिर झाल्या.

    एक कारकून ते देशाच्या महामहिम हा प्रवास वाटतो तितका सोप्पा नव्हता. पण जिद्द, संघर्ष आणि चिकाटीच्या जोरावर आदिवासी बहुल भागातील एक सामान्य महिला आज देशाची प्रथम नागरिक होते हे गौरवास्पद आहे

अजून वाचा / Read More


Post a Comment

0 Comments