Header Ads Widget

Chatur Kasav | Marathi Story | चतुर कासव | मराठी कथा

Chatur Kasav | Marathi Story | चतुर कासव | मराठी कथा 

चला तर मित्रांनो, आपण आम्ही तुमच्यासाठी एक चांगली आणि छान गोष्ट Chatur Kasav | Marathi Story | चतुर कासव | मराठी कथा घेऊन आलेलो आहोत. या गोष्टीमध्ये आपण कासव आणि कोल्हा या दोघांमधील घटना पाहणार आहोत. एखाद्या अडचणीमध्ये सापडलेल्या कासवाला त्या अडचणीमधून बाहेर पडण्यासाठी काय करावे लागते ते आपण या गोष्टींमधून पाहणार आहोत 

Chatur Kasav | Marathi Story | चतुर कासव | मराठी कथा 

चला तर मग बघूया Chatur Kasav | Marathi Story | चतुर कासव | मराठी कथा 

    एक जंगल होते. त्या जंगलामध्ये खूप सारी झाडी होती. त्या जंगलामध्ये खूप सारे प्राणी देखील होते.     
    एकदा एका कोल्ह्याला खूप भूक लागली होती. भुकेच्या शोधामध्ये तो संपूर्ण जंगल उलटेपालथे करू लागला. असंच फिरता फिरता फिरता फिरता, त्याला एका ठिकाणी एका नदीच्या काठावर त्याला एक कासव दिसले. 

    अन्नाच्या शोधात फिरत असताना कासवाकडे बघून त्याला समाधान मिळाले. खूप भूक लागली होती, त्यामुळे त्या कोल्ह्याने त्या कासवाला पकडले. पण कासवाचे कवच खूप कडक असल्यामुळे तो कोल्हा त्या कासवाला खाऊ शकला नाही.

    कोल्हा खूप प्रयत्न करू लागला त्या कासवाला खाण्याचा, परंतु त्या कासवाच्या कठीण कवचामुळे त्या कोल्ह्याचे दातच पडले. त्या कासवाला या कोल्ह्याने पकडले असल्यामुळे कासव खूप घाबरले. आता या कोल्ह्याच्या तावडीतून कसे सुटायचे याचा तो विचार करू लागला. 
Chatur Kasav | Marathi Story | चतुर कासव | मराठी कथा
Chatur Kasav | Marathi Story | चतुर कासव | मराठी कथा 

    तेव्हा त्याला एक कल्पना सुचली. ते कासव त्या कोल्ह्याला म्हणाले,  "कोल्होबा" मला थोड्या वेळ पाण्यात भिजत ठेवा मग माझे कवच मऊ पडेल आणि मग तुम्ही मला सहज आणि चांगल्या रीतीने मला खाऊ शकाल. असं त्या कासवाने त्या कोल्ह्याला सुचवलं. 

    या कासवाच्या सांगण्यावरून कोल्ह्याचा त्या कासवावर विश्वास बसला. म्हणून त्याने त्या कासवाला नदीच्या पाण्यात सोडले. 

    आणि आपल्या सर्वांना तर माहीतच आहे की, कासव हे पाण्यामध्ये नेहमी असते. त्याचे जीवन हे पाणीच आहे. त्यामुळे पाण्यामध्ये सोडताक्षणीच कासव पटकन कोल्ह्यापासून दूर गेले आणि पोहोत पोहोत सुरक्षित ठिकाणी पोहोचले.

    अशा रीतीने हे कासव त्या कोल्ह्याच्या तावडीतून सुटले. 

असे होते हे चतुर कासव.

Chatur Kasav | Marathi Story | चतुर कासव | मराठी कथा 

Read Other Story | अजून कथा वाचा

Post a Comment

0 Comments